Saturday, May 8, 2010

वाटेवरून चालताना तुझी हवी होती सोबत....


वाटेवरून चालताना तुझी हवी होती सोबत
पण तू घेतलीस कुणा दुसर्‍याची सोबत,

माझ्या मनातले तुला सांगायचे होते
पण तुझ्या मनात दुसरेच कुणी होते,

तरी सुद्धा थोडी ओढ होती तुला
म्हणूनच काही क्षण भेटायला आलास मला,

खर सांगू,
पण त्या भेटीत सुद्धा तू माझा नव्हतास
खूप छान गेला तो दिवस,
पण मावळताना डोळ्यात अश्रू देऊनी गेलास

त्याच दिवसापासून माझ्या आयुष्याचा सुर्यास्त झाला
जाताना जुन्या आठवणी फक्त ठेऊनी गेला,

वाटेवरून चालताना तुझी हवी होती सोबत....
.
.
.
.
.

2 comments:

  1. अप्रतिम कविता लिहिली आहेस सोनल.हा ब्लॉग मराठी ब्लॉग विश्व (http://marathiblogs.net/)येथे जोडला तर वाचक भरपूर मिळतील आणि मनाला पुनः लिहिण्याची उभारी येईल.
    असो लिहीत रहा.

    ReplyDelete
  2. Hi kavita mazi aahe mi lihili aahe who is sonal

    ReplyDelete