Thursday, April 22, 2010

कसे सरतील सये...

कसे सरतील सये, माझ्याविना दिस तुझे
सरताना आणि सांग सलतील ना
गुलाबाची फुलं दोन रोज रात्री डोळ्यांवर
मुसुमुसु पाणी सांग भरतील ना, भरतील ना...

पावसाच्या धारा धारा मोजताना दिस सारा
रिते रिते मन तुझे उरे
ओठ वर हसे हसे उरातून वेडेपिसे
खोल खोल कोण आत झुरे
आता जरा अळिमिळी तुझी माझी व्यथा निळी
सोसताना सुखावुन हसशील ना,
गुलाबाची फुलं दोन...

कोण तुझ्या सौधातून उभे असे सामसूम
चिडीचुप सुनसान दिवा
आता सांज ढळेलच आणि पुन्हा छळेलच
नभातून गोरा चांदवा
चांदण्यांचे कोटी कण आठवांचे ओले सण
रोज रोज निजपर भरतील ना,
गुलाबाची फुलं दोन...

इथे दूरदेशी माझ्या सुन्या खिडकीच्या पाशी
जडेसर काचभर तडा
तूचतूच तुझ्यातुझ्या तुझीतुझी तुझेतुझे
सारासारा तुझा तुझा सडा
पडे माझ्या वाटेतून आणि मग काट्यातून
जातानाही पायभर मखमल ना,
गुलाबाची फुलं दोन...

आता नाही बोलायाचे जरा जरा जगायाचे
माळूनिया अबोलीची फुले
देहभर हलू देत विजेवर झुलू देत
तुझ्या माझ्या विरहाचे झुले
जरा घन झुरु दे ना वारा गुदमरु दे ना
तेव्हा नभ धरा सारी भिजवील ना,

गुलाबाची फुलं दोन रोज रात्री डोळ्यांवर
मुसुमुसु पाणी सांग भरतील ना, भरतील ना...

sandeep khare

परीक्षा

Syllybus जरा जास्तच आहे
दर वर्षी वाटतो...
Chapters पाहून Passing चा
Problem मनात दाटतो...

तरी lectures चालू राहतात
डोक्यात काही घुसत नहीं....
चित्र-विचित्र figures शिवाय
Board वर काहीच दिसत नाही....

तितक्यात कुठून तरी Function ची
Date जवळ येते...
Sem मधले काही दिवस
नकळत चोरून नेते...

नंतर lecturers Extra घेउन
भरभरा शिकवत राहतात...
Problems Example Theory सांगून
Syllybus लवकर संपवू पाहतात...

पुन्हा हात चालू लागतात...
मन चालत नाही....
सरांशिवाय वर्गामध्ये
कुणीच बोलत नाही...

Lectures संपून Submission चा
सुरु होतो पुन्हा खेळ..
journal Complete करण्यामध्ये
फार फार जातो वेळ...

चक्क डोळ्यांसमोर Syllybus
चुटकी सरशी sampun जातो..
'PL's मध्ये वाचून सुद्धा
Paper काबर सो...सो..च जातो????

-Author Unknown

आयुष्य

आज म्हटल आयुष्य विणायला घेउया
जमतय का ते बघुया
वाटल अगदी सोप असेल
रंगसंगती जमून आली की आयुष्यही सुंदर दिसेल

प्रश्न पडला धागे कोणकोणते घ्यायचे
एक दोनच की सगळेच वापरायचे

मग ठरवल फक्त छान छानच धागे घेऊ
एक काय दोन काय सगळेच एकमेकांत विणु

सुरुवात केली वात्स्ल्याच्या धाग्याने
धागा होता फार उबदार आणि मुलायम
म्हटल छान आहे हा धागा
धाग्याने ह्या विण राहील कायम

मग घेतला मैत्रीचा धागा
म्हणता म्हणता ब-याच भरल्या जगा
थोड थोड आयुष्य आकार घेऊ लागलेल
पण अजुनही बरचस विणायच बाकी रहिलेल

एक एक धागा आशेचा, सुखाचा आणि आनंदाचा घेतला
प्रत्येक धाग्यात तो आपसुकच गुंफत गेला
हळू हळू विण घट्ट होत होती
तरीदेखील कसली तरी कमी मात्र होती

मग घेतला एक नाजुक प्रेमाचा धागा
धागा होता सुंदर आणि रेशमी
धाग्याने त्या आयुष्याला
अर्थ आला लागुनी

एक एक घेतला धागा
यशाचा, कीर्तीचा आणि अस्तित्वाचा
आयुष्याला त्यामुळे एक नवा
उद्देश्य मिळाला

सगळेच धागे छान, सुंदर आणि प्रसन्न होते
तरीदेखील त्यांच्यातल्या एकसारखीपणाने मन मात्र खिन्न होते

थोड़े धागे पडले होते
निवांत बसून असेच
म्हटल बघुया तरी ह्यांच्यामुळे
आयुष्य होतय का सुरेख

मग घेतला एक धागा दुक्खाचा एक निराशेचा
एक धागा अपयशाचा आणि एक धागा पराजयाचा
हे चारही धागे विणता एकमेकांमधे
आयुष्याला खरा अर्थ लाभला त्यांच्यामुळे

अपयशाशिवाय यश नाही
दुक्खाशिवाय सुख नाही
पराजयाशिवाय जय नाही
आणि निराशेशिवाय आशा नाही

महत्व पटल आहे सर्व धाग्यांच आज मला
सुंदर सुंदर धाग्यांनिच फक्त मजा नसते आयुष्याला

साध्या सुध्या लोकरीच्या विणकामातही
रंगसंगती ही लागतेच
मग आयुष्य विणतानाच
आपल्याला भीती का वाटते?

सर्व धागे एकमेकांत विणुनच
एक परिपूर्ण आयुष्य बनत
कुठला धागा कुठे, कसा वापरायचा
हे मात्र ज्याच त्याच्यावर असत......



Author Unknown

लाख क्षण अपूरे पड़तात.......






अनामिक   

मन

कधी कळलंय का कोणाला
हे मन निराकार
कधी  अगदी  सूक्ष्म तर कधी अथांग

मन आहे तरी कसे
हळुवार फुलासारखे  की त्या फुलावर
भिरभिरणाऱ्या  फूलपाखरासारखे

मन आहे तरी कसे
उनाड सैरभैर वाऱ्यासारखे की  त्याला  थोपवणाऱ्या
धीरगंभीर पर्वतासारखे

या मनाचे  रंगच  वेगळे
कधी  कोणावर  रुसत
तर  कधी स्वतःवरच  हसत

कधी कधी ते आपलेही  राहत नाही
अगदी हळवे होते कोणासाठी
काय बरे  मनाच्याही  मनात………… त्या  कोणासाठी

                       ....................प्रसाद

नातं

काही माणसे असतात खास
जि मैत्रीने खांद्यावर हात टाकतात,
दुःख आले जिवनात तरीही
कायम साथ देत राहातात.

काही माणसं मात्र
म्रुगजळाप्रमाणे भासतात,
जेवढे जवळ जावे त्यांच्या
तेवढेच लांब पळत जातात.

काही माणसे ही गजबजलेल्या
शहरासारखी असतात,
गरज काही पडली तरच
आपला विचार करतात,
बाकीच्या वेळी ति सारी नाती विसरतात
काही हवे असेल स्वतःला तर तुम्हाला मित्र मित्र करतात.

मात्र काही माणसं ही
पिंपळाच्या पानासारखी असतात,
जाळी झाली त्यांची तरी मनाच्या
पुस्तकात आयुष्यभर जपून ठेवाविशी वाटतात....


या जगात सर्वात सुंदर काय अस विचारलं तर
मी म्हणेन, माणसाचं माणसासोबत असलेल नातं.

अस नातं गुंफ़ता गुंफ़ता
स्वत:सोबत स्वत:चेच एक नाते
नकळतं गुंफ़ले जात असते...

कितीतरी खोल द-या, उंचच सुळक्यांचे डोंगर
अन काटेरी झुडपांचे रस्ते पार करतांना,
नात्याला धक्का न लागू देण्याची ती असोशी....

जगण्याचे सगळे संदर्भ त्या नात्यात एकवटून यावेत
अन जगता जगता ते नातंच एकाएकी गवसेनासं व्हावं..

रिकाम्या ओंजळीनेच मग
जगण्याचे सगळे धडे भरभरुन द्यावे.....

असं नातं जसं समृध्द करतं.... तसच वाताहातही करतं...

तरीही,

या जगात सर्वात सुंदर काय अस विचारलं तर
मी म्हणेन, माणसाचं माणसासोबत असलेल नातं

unknown author