Friday, May 14, 2010

का कुणास ठाऊक प्रत्येकाला वाटते

का कुणास ठाऊक प्रत्येकाला वाटते
कुणीतरी आपल्यासाठी असावे
ज्याच्यावर आपण थोडेफार रुसावे
आपल्या डोळ्यातील अश्रु एकदा तरी त्यानेच पुसावे
रागवता आपण, त्याने आपल्याला समजवावे

मनातील व्यथांना त्याच्याच जवळ मोकळे करावे
उशिर झाला केंव्हा तर लटके लटके रुसावे
पण वाट पहात आपली त्याने तिथेच असावे

केंव्हा नटता सावरता आपण
त्याने मनापासुन कौतुक करावे
का कुणास ठाऊक प्रत्येकालाच वाटते..
कुणीतरी आपल्यासाठी असावे!

Saturday, May 8, 2010

"कुणीतरी आठवणं काढतय, बाकी काही नाही......"

कुणीतरी आठवणं काढतय, बाकी काही नाही......

बाकी काही नाही
हसता हसता डोळे अलगद भरुनही येतील
बोलता बोलता शब्द ओठी जातीलही विरुन
कावरंबावरं होण्यासारखं बिलकुल काही नाही
कुणीतरी आठवणं काढतय, बाकी काही नाही......

रस्त्यामध्ये दिसतातच की चेहरे येता-जाता
"एका" सारखेच दिसू लागतील सहज बघता बघता
अवती भोवती सगळीकडे तेच माणूस दिसेल
स्रुष्टीमध्ये दोनच जीव आणखी कुणी नसेल
भिरभिरल्यागत होण्यासारखं बिलकुल काही नाही
कुणीतरी आठवणं काढतय, बाकी काही नाही......

मोबाईल वाजण्याआधीच तो वाजल्य़ासारखा वाटेल
जुनाच काढून एसएमएस वाचावासा वाटेल
दिवस सरता वाटत जाईल उगाचच उदास
पावलोपावली जड होत जाईल बहुधा श्वास
घाबरुनं बिबरुनं जाण्यासारखं काही नाही
कुणीतरी आठवणं काढतय, बाकी काही नाही......

जेवता जेवता जीवघेणा लागेलही ठसका
घरचे म्हणतील सारखा कसा लागतो उठता बसता
चेहरा लपवत, डोळे पुसत, पाणी प्यावे थोडे
बोलण्याआधी आवाजाला सांभाळावे थोडे
सांगुन द्याव काळजीसारख बिलकुल काही नाही

"कुणीतरी आठवणं काढतय, बाकी काही नाही......"

वाटेवरून चालताना तुझी हवी होती सोबत....


वाटेवरून चालताना तुझी हवी होती सोबत
पण तू घेतलीस कुणा दुसर्‍याची सोबत,

माझ्या मनातले तुला सांगायचे होते
पण तुझ्या मनात दुसरेच कुणी होते,

तरी सुद्धा थोडी ओढ होती तुला
म्हणूनच काही क्षण भेटायला आलास मला,

खर सांगू,
पण त्या भेटीत सुद्धा तू माझा नव्हतास
खूप छान गेला तो दिवस,
पण मावळताना डोळ्यात अश्रू देऊनी गेलास

त्याच दिवसापासून माझ्या आयुष्याचा सुर्यास्त झाला
जाताना जुन्या आठवणी फक्त ठेऊनी गेला,

वाटेवरून चालताना तुझी हवी होती सोबत....
.
.
.
.
.

काही नाती बांधलेली

काही नाती बांधलेली असतात
ती सगळीच खरी नसतात
बांधलेली नाती जपावी लागतात
काही जपून ही पोकळ राहतात
काही मात्र आपोआप जपली जातात
कदाचित त्यालाच मैत्री म्हणतात.
जे जोडले जाते ते नाते
जी जडते ती सवय
जी थांबते ती ओढ
जे वाढते ते प्रेम
जो संपतो तो श्वास
पण निरंतर राहते ती मैत्री
फ़क्त मैत्री...........
मोहाच्या नीसटत्या क्षणी
परावृत्त करते ती मैत्री,
जीवनातल्या कडूगोड क्षणांना
निशब्द करते ती मैत्री,
जीवनाच्या आंतापर्यंत प्रत्येक पावलला
साथ देते ती मैत्री,
आणि जी फक्‍त आपली असते,
ती मैत्री