Thursday, April 22, 2010

नातं

काही माणसे असतात खास
जि मैत्रीने खांद्यावर हात टाकतात,
दुःख आले जिवनात तरीही
कायम साथ देत राहातात.

काही माणसं मात्र
म्रुगजळाप्रमाणे भासतात,
जेवढे जवळ जावे त्यांच्या
तेवढेच लांब पळत जातात.

काही माणसे ही गजबजलेल्या
शहरासारखी असतात,
गरज काही पडली तरच
आपला विचार करतात,
बाकीच्या वेळी ति सारी नाती विसरतात
काही हवे असेल स्वतःला तर तुम्हाला मित्र मित्र करतात.

मात्र काही माणसं ही
पिंपळाच्या पानासारखी असतात,
जाळी झाली त्यांची तरी मनाच्या
पुस्तकात आयुष्यभर जपून ठेवाविशी वाटतात....


या जगात सर्वात सुंदर काय अस विचारलं तर
मी म्हणेन, माणसाचं माणसासोबत असलेल नातं.

अस नातं गुंफ़ता गुंफ़ता
स्वत:सोबत स्वत:चेच एक नाते
नकळतं गुंफ़ले जात असते...

कितीतरी खोल द-या, उंचच सुळक्यांचे डोंगर
अन काटेरी झुडपांचे रस्ते पार करतांना,
नात्याला धक्का न लागू देण्याची ती असोशी....

जगण्याचे सगळे संदर्भ त्या नात्यात एकवटून यावेत
अन जगता जगता ते नातंच एकाएकी गवसेनासं व्हावं..

रिकाम्या ओंजळीनेच मग
जगण्याचे सगळे धडे भरभरुन द्यावे.....

असं नातं जसं समृध्द करतं.... तसच वाताहातही करतं...

तरीही,

या जगात सर्वात सुंदर काय अस विचारलं तर
मी म्हणेन, माणसाचं माणसासोबत असलेल नातं

unknown author

No comments:

Post a Comment